मंथन
मंथन हा एक पालक शिक्षक सहयोगावर चालणारा मंच आहे. हा मंच म्हणजे पालक आणि शाळा यांच्यातील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे.
या मंचाचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक असतात. उपाध्यक्ष हे इतर सर्व पालक प्रतिनिधींनी निवडलेले पालक प्रतिनिधी असतात. तसेच शिक्षक प्रतिनिधींपैकी एक शिक्षक सचिव म्हणून काम पाहतो.
शालेय उपक्रमांमध्ये पालकांच्या सहभागामध्ये मंथनची भूमिका महत्त्वाची असते. मंथनचे प्रतिनिधी बालमोहन परिवाराला बालदीन, सहली, विज्ञान प्रदर्शन आणि शाळेचे अनेक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतात.
मंथन परस्परांतील समंजसपणा आणि सहकार्य वाढवतो, अशा प्रकारे शाळा आणि विद्यार्थ्यांचे कल्याण या समान उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवादात्मक संबंध सुनिश्चित करतो.
या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.