loader image

बालमोहन साहित्य

माझे जीवन, माझी 'बाळं'…

दादांसारख्या थोर, सेवाभावी, प्रेमळ, आदर्श शिक्षकाने लिहिलेले हे आत्मचरित्र म्हणजे त्यांची जीवनविषयक दृष्टी, त्यांनी केलेले शैक्षणिक प्रयोग, स्वीकारलेली जीवनमूल्ये, सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य, त्यांना मिळालेल्या प्रेरणा, भेटलेले पालक, नागरिक, अधिकारी, त्यांनी घडवलेले विद्यार्थी, त्यांच्यापुढे उभी राहिलेली संकटे आणि त्यांना सामोरे जाताना दाखवलेले धैर्य ह्याचे प्रतिबिंब.

ओळख मुलांची, आपली

बालमोहन विद्यामंदिराच्या हीरक महोत्सवानिमित्त संस्थेने जे अनेक उपक्रम विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आयोजित केले, त्यातील बालहिताच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम ‘पालक-प्रबोधन व्याख्यानमाला’ हा होता. ह्या व्याख्यानमालेत १५ शिक्षणतज्ञांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी, लेखकांनी मार्गदर्शन केले. आणि ह्या व्याख्यानमालेत विचार संग्रहित करण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

माणूस घडविण्यासाठी

शाळा ही शिक्षण देणारी यंत्रणा आहे. पण शिक्षण द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे असते? प्रश्न सोपा असला तरी उत्तर गुंतागुंतीचे आहे. शिक्षणाचा हेतू काय आहे? शिक्षणाचे प्रयोजन काय आहे? एका परिसंवादात याच प्रश्नावर साधक-बाधक चर्चा सुरू असताना कोपऱ्यात बसलेला एक श्रोता उभा राहिला आणि म्हणाला, “एवढी चर्चा कशासाठी करता? शाळेचे मूलभूत कार्य ‘माणूस घडविण्यासाठी’ चालते.”

आठवणीतील पाऊले

मूल्यशिक्षणातून संस्कारक्षम विद्यार्थी घडतात आणि तेच देशाचे भवितव्य घडवतात या भूमिकेतून दादासाहेब रेगे या शिक्षणमहर्षींनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी स्थापन केलेल्या “बालमोहन” शिक्षणसंस्थेची मुद्रा, तिच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार असलेल्या त्यांच्या सुपुत्राने, डॉ. बापुसाहेब रेगे यांनी, ती अधिक तेजस्वी केली. बापुसाहेबांनी त्यांच्या सात्विक, संयमी आणि आस्थेवाईक स्वभावाने शिक्षणक्षेत्रात आपली मोहोर उमटवली. त्यांच्या जीवनप्रवासाच्या या आठवणी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची प्रेरणा देणार्‍या…

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.