विद्यार्थी परिषद
विद्यार्थ्यांमध्ये निग्रही वृत्ती, सांघिक कौशल्य, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्व क्षमता शालेय जीवनापासूनच जोपासल्या जाव्यात आणि विश्वाचा संस्कारक्षम नागरिक घडवा यादृष्टीने शालेयस्तरावर विद्यार्थी परिषदची स्थापना केली जाते. त्यासाठी शाळेतील अभ्यासक्रमाला पूरक अशी कुलपद्धती तयार केली जाते . कुलपद्धतीच्या चार गटांना ध्रुव, प्रल्हाद, आरुणी, एकलव्य अशी गुणदर्शक आणि औचित्यपूर्ण नावे दिलेली आहेत. प्रत्येक गटाचा प्रमुख लोकशाही निवडणूक पद्धतीचा अवलंब करून निवडला जातो. विद्यार्थी मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतात. विद्यार्थी नागरिकशास्त्राचे धडे यातूनच घेतात. यातूनच विद्यार्थी परिषद तयार होते.
कुलांना सोपविलेल्या स्वच्छता, शिस्त, वाचन, मनोरंजन या कामांतही विद्यार्थी जीवनातील प्रमुख अंगांचा समावेश केला जातो, त्यांच्या उपजत गुणांची यामुळे जडणघडण होते. परिषदेचे प्रमुख हेड बॉय आणि हेड गर्ल म्हणून संबोधले जातात. सर्व तुकड्यातील गटप्रमुखांमधून प्रत्येक गटाचा एक कॅप्टन आणि एक वाईस कॅप्टन निवडले जातात. शालेयस्तरावरील विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून प्रातिनिधिक राज्य व्यवस्थेचे ज्ञान विद्यार्थ्यांना होते त्यातुन उत्तरदायित्व निर्माण करणारी व्यवस्था निर्माण होते.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.