loader image

संस्थेचं बोधचिन्ह

सर्वांगीण शैक्षणिक घटकांचा अंतर्भाव असलेलं प्रतीक म्हणजे बालमोहन विद्यामंदिरचं बोधचिन्ह. सुवर्णात ढालीच्या (हेराल्डिक) रचनेमध्ये शिक्षणाचं दैवत समजली जाणारी साक्षात सरस्वती रेखाटली आहे तसंच जगणं समृद्ध करणाऱ्या उदयोन्मुख सूर्यकिरणांसह सशक्त पाया असणारं, मातीशी घट्ट नातं सांगणारं हे बोधचिन्ह आहे.

प्रार्थना

अंतर मम विकसित करी हे परात्परा ll

Audio Player

अंतरमम विकसित करी हे परात्पराllधृll
निर्मलकरी, उज्ज्वलकरी
जागृतकरी, उद्युतकरी,
निर्भयकरी , मंगलकरी , हृदय भास्कराll१ll अंतरमम…
करी निरलस नि:संशय
करी रे करी शुदधाशय ,
करी हे मन निर्विषय, जीवितेश्वराll२ll अंतरमम….

मूळ रचना : रवींद्रनाथ टागोर

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥

ब्रह्मा कृत स्तुति

सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःखमाप्नुयात् ॥
ॐ असतो मासद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय॥
मृत्योर्मा मृतंगमय।
ॐशान्ति शान्ति शान्तिः॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

संत ज्ञानेश्वर

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे

जयांना कोणि ना जगती, सदा ते अंतरी रडती, तया जाऊन सुखवावे

समस्ता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा, अनाथा साह्य ते द्यावे

सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजिती सकल, तया जाऊन हसवावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधु मानावे

प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणा ना तुच्छ लेखावे

जिथे अंधार औदास्य, जिथे नैराश्य आलस्य, प्रकाशा तेथ नव न्यावे

असे जे आपणापाशी, असे जे वित्त वा विद्या, सदा ते देतची जावे

भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात, सदा हे ध्येय पूजावे

असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा, त्याने प्रेममय व्हावे

साने गुरुजी

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.