वैज्ञानिक दृष्टीकोन
वैज्ञानिक दृष्टीकोन
जगातील गोष्टींकडे पहाताना सारासार विवेकाने, स्थिर बुद्धीने आणि तर्काच्या कसोटीवर खरे उतरणे अपेक्षित असते. अर्थात यासाठी लहान वयात मुलांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा आणि विज्ञानाविषयीची जिज्ञासा जागृत व्हायला हवी.
वैज्ञानिक दृष्टीकोन शालेय जीवनापासून विकसित करण्याचे काम बालमोहनमध्ये निरंतर होते. विज्ञान प्रदर्शन, नेहरू विज्ञानकेंद्र भेट, विविध महाविद्यालयांच्या विज्ञानविषयक आयोजनांना भेटी, पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीस सक्षम केले जाते.
वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राचं बालमोहनशी असलेलं नातं हे अतूट आहे. आपले विद्यार्थी दरवर्षी विज्ञान केंद्राच्या ‘इनोव्हेशन हब’ या प्रयोगशाळेत तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करतात. तेथे ते विविध प्रयोगांच्या माध्यमातून सहजसोपे विज्ञान शिकतात. तसेच प्रयोगशाळेतील जबाबदार वर्तनही शिकतात.
प्रयोगशाळेतील भिंतीवर लावलेली शास्त्रज्ञांचा परिचय करून देणारी भित्तीचित्रे त्यांना विज्ञानाधिष्ठ विचारासाठी प्रवृत्त करतात.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.