loader image

आठवणी

बालमोहनाच्या ८० वर्षाच्या प्रवासातील अशा आठवणी ज्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात, पण त्याचवेळेस भविष्यातील वाटचालीला हुरूप देतात.

ध्वनिफीत संग्रह

शाळेच्या आठवणी जमेल तितकं ध्वनिफीत स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पण तरीही तुमच्याकडे अशा आठवणी ध्वनिफीत स्वरूपात असतील तर आम्हाला जरूर पाठवा आम्ही त्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा निश्चित प्रयत्न करू.

दीदींचा शुभसंदेश, दीदींच्या स्वरात !

by लता मंगेशकर

बालमोहन बालदिनानिमित्त आचार्य अत्रेंचं दुर्मिळ भाषण

by प्रल्हाद केशव अत्रे

चलचित्र संग्रह

शाळेच्या आठवणी जमेल तितकं चलचित्र स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पण तरीही तुमच्याकडे अशा आठवणी चलचित्र स्वरूपात असतील तर आम्हाला जरूर पाठवा आम्ही त्या इथे ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करू.

अभिमान सोहळा

२०१९ साली महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील हे दोघेही बालमोहन विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी आहेत. म्हणून त्यांचा १० फेब्रुवारी २०२० रोजी संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

परिसंवाद

बालमोहनच्या विद्यार्थ्यांना तसंच बालमोहनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तज्ञांचं, अभ्यासकांचं मार्गदर्शन लाभावं म्हणून ‘एबीपी माझा’ ह्या वृत्तवाहिनीतर्फे आयोजित परीक्षा परिषदेत बालमोहन विद्यामंदिरने संयोजकाची भूमिका बजावली.

भारतीय सैनिकांना स्नेहपत्र

सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दल समाज म्हणून आपण कृतज्ञ तर असलंच पाहिजे पण आपलं सर्वस्व पणाला लावून रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेमही व्यक्त केलं पाहिजे आणि ते त्यांच्यापर्यंत पत्राच्या अभिव्यक्तीतून पोहचावं म्हणून हा अभिनव उपक्रम. दिवाळीचा फराळदेखील ऐन युद्धाच्या धामधुमीच्या प्रसंगी बालमोहनमध्ये तयार करून पाठविला तेव्हा तो नेण्यासाठी लष्कराचे विमान विमानतळावर तैनात होते.

पुस्तक प्रकाशन सोहळे

मराठी साहित्य विश्वापासून मराठी शिक्षण संस्थांनी अलिप्त राहता कामा नये. म्हणूनच बालमोहन संस्था माजी विद्यार्थी, समाजातील मान्यवर ह्यांचे पुस्तक प्रकाशन सोहळे, त्यावर परिसंवाद, मराठी विश्वकोश अशा उपक्रमांना प्रोत्साहन देते.

मान्यवरांची मांदियाळी

बालमोहनच्या निर्मितीपासून अनेक सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्थित्यंतरं घडली, त्या सर्व परिस्थितीतून काही व्यक्तिमत्त्व तावून-सुलाखून तेजोमय झाली. अशा मान्यवरांची बालमोहन वास्तुतील उपस्थिती हा आमच्यासाठी शारदेचा आशीर्वाद असतो.

आठवणी

बालमोहन विद्यामंदिरात होणारे विविध कार्यक्रम, सहल, प्रदर्शनं अशा सर्व उपक्रमांची क्षणचित्रे.

कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण

जगभरात न भूतो अशी कोरोना महासाथ आली होती. ज्यामुळे संपूर्ण जग तब्बल दोन वर्षे पूर्णतः टाळेबंदीत होतं. ही टाळेबंदी तेव्हाच उठणार होती जेव्हा कोव्हीड प्रतिबंधक लस उपलब्ध होणार होती. बालमोहन विद्यामंदिर ह्या लसीकरण मोहिमेसाठी सुसज्ज होते त्यामुळे जेव्हा लस उपलब्ध झाली आणि सरकारकडून निर्देश आले तेव्हा सर्व वैद्यकीय काळजी घेत शाळेत विद्यार्थ्यांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली. त्याच उपक्रमाची क्षणचित्रे.

दादासाहेब रेगे संगणक ज्ञानांगण

१९ व्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती झाली आणि संगणक आपल्या आयुष्यात प्रवेशला. हे येणारं नवं तंत्रज्ञान बालमोहन विद्यार्थ्यांना शिकता यावं ह्यासाठी १९८५ साली बालमोहन संगणक वर्ग सुरु करण्यात आला.

संस्कार सोहळा

संस्कार अलगद मुलांच्या भावविश्वात संचारावेत ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच बालमोहनमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थ्यांकडून चाफ्याचे फुल आणि रंगीबेरंगी फुगे देऊन उत्साहात स्वागत होणे, ऋतुबदलानुसार आहाराची ओळख करून देणे असे संस्कारक्षम उपक्रम राबविले जातात.
या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.