loader image

ध्येय – धोरणं

भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते १९६२ मध्ये ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शिकण महर्षी दादासाहेब रेगे, यांनी १९४० मध्ये बालमोहन विद्यामंदिरचे बीजारोपण केले. आधुनिक, तणावमुक्त, आनंदी वातावरणात बालमनाची जडण घडण करणारी, ८ विद्यार्थी आणि ४ शिक्षक मिळून तयार झालेली ही शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने आज सांस्कृतिक केंद्र बनली आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ सप्टेंबर २००२ साली शिक्षण आणि जनकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘Premier Institute of state’ म्हणून बालमोहनला सन्मानित केले.

शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांच्या शैक्षणिक धोरणाचे पालन करीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही त्यांना प्रेरणादाई, सर्जनशील, निर्भय, तणावमुक्त, आनंददायी वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतो.

विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांना सक्षम करणे, वास्तविक जगाच्या आव्हानांना समरसतेने तोंड देणे हा आमचा प्रयत्न आहे. अध्ययन, मनन, चिंतन आणि आचरणाचे संस्कार येथे दिले जातात, त्यातूनच ज्ञानर्जन करणारा आणि आत्मोन्नती मार्ग प्रकाशित करणारा यशस्वी ‘बालमोहनकर’ घडविणे हेच आमचे ध्येय आहे.

‘सा विद्या या विमुक्तये!’ या उक्तीनुसार शिक्षणातून निर्भयता आत्मविश्वास, स्वावलंबन, आदराची भावना निर्माण करून मुलांच्यातील उपजत गुण, प्रतिभा, सामर्थ्य वृद्धिंगत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.