loader image

माणूस घडवण्यासाठी

काही करता येण्याजोग्या गोष्टी

संशोधन

। मुंबई आयआयटी

मुंबईच्या आयआयटी, पवईमाधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग विभागात प्राध्यापक ‘कंट्रोल अँड सिस्टम थिअरी विषयांतर्गत संशोधन.

अलीकडे बऱ्याच शाळांतून पालक-शिक्षक समिती कार्यरत असल्याचे मी ऐकले आहे. ही समिती काय करते याविषयी मला विशेष माहिती नाही, पण पालक-शिक्षक काय करू शकतील व त्यांनी ह्या गोष्टी कराव्यात ह्याबद्दल काही सूचना करतो.

मी पीएचडी पदवी प्राप्त केली तेव्हा लाक्षणिक अर्थाने माझे शिक्षण संपले, पण त्यानंतर प्राध्यापकाचा व्यवसाय सुरू झाल्याने माझे शिक्षण तसेच चालू राहिले. मला वाटते पालक व शिक्षक या दोघांनाही परस्पर सहकार्याने आपले शिक्षण चालू ठेवता येईल. आणि या शिक्षणाचा पाल्यांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल. आज बहुतेक शहरात तरी पालक-वडील व आई दोघेही थोडेबहुत सुशिक्षित असतात. डॉक्टर, इंजिनीयर, वकीलच नव्हे तर कारकून, शिपाईसुद्धा खरे सांगावयाचे तर आपले शालेय शिक्षण जेव्हा होते तेव्हा त्या वयात आपण जे काही शिकतो त्यावर फारसा विचार करीत नाही व त्यामुळे ते बरेचसे विसरून जातो. आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या निमित्ताने पालकांना स्वत:च्या शिक्षणाची उजळणी करून आनंद मिळवता येईल. यात शिक्षकांचे मार्गदर्शन होऊ शकेल. या उलट काही विषयांत शिक्षकांना पालकांकडून मार्गदर्शन होऊ शकेल. उदाहरणार्थ, नागरिकशास्त्रातील ‘महानगरपालिका’ या विषयावरचा पाठ घेऊया. महानगरपालिकेत प्रत्यक्ष काम करणारे पालक-मग ते शिपाई का असेनात – आपल्या अनुभवाच्या बळावर चार गोष्टी शिक्षकांना सांगू शकतील.

आज आपण व्यस्त असल्याचे कितीही जरी सांगत असलो तरी आपल्याकडे पुष्कळ वेळ असतो. दूरदर्शन, चित्रपट इत्यादीमध्ये फार वेळ न घालवता एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही गोष्ट अशक्य आहे काय?

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.